Sunday, March 26, 2017

Sakal article on happiness

सुखी आणि आनंदी होण्याची आपल्या सगळ्यांची धडपड असते. किंबहुना आनंद आणि मन:शांती मिळवण्यासाठीच प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत असते. आपल्याला कायमस्वरूपी आनंदी राहता येतं का? जीवनातला प्रत्येक क्षण आपण खऱ्या अर्थानं जगू शकतो का? या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहेत. मग त्यासाठी आपल्याला विशिष्ट दिशेनं प्रयत्न करावे लागतील. मनाच्या सवयींची, विचारांची धाटणी, जगण्याविषयीचा दृष्टिकोन बदलायला लागेल. हे मनाचं रिप्रोग्रॅमिंग असंल. विशिष्ट पद्धतीनं मनाची मशागत झाल्यास आनंदाची, समाधानाची बीजं पेरली जातील. सकारात्मकता, भौतिक जीवनातील यश आणि आंतरिक सुखाची निरंतर शक्‍यता निर्माण होईल. मनाची मशागत करताना काही सकारात्मक भावना, विचार आणि दृष्टिकोन आपला भागच बनवून टाकाव्या लागतील.
या सर्व गोष्टींचा आपण आजच्या लहान आणि तरुण मुलांच्या दृष्टीनं विचार करायला हवा. कारण हीच पिढी येत्या काळात आनंदी आणि समृद्ध समाज असेल. मुळात मला समृद्ध आयुष्य हवंय म्हणजे त्यासाठी केवळ भरपूर पैसा हवा, भौतिक गोष्टींची रेलचेल हवी, हा दृष्टिकोन चुकीचा असू शकतो. खऱ्या अर्थानं समृद्ध आयुष्यासाठी माझ्याकडं सहा गोष्टी असणं गरजेचं आहे.
१) शारीरिक स्वास्थ्य
२) मानसिक स्वास्थ्य
३) माणसांबरोबरच निसर्गातल्या प्रत्येक घटकाशी छान नातं
४) पुरेसा पैसा (लालसा कुठे सुरू होते, हे कळणं महत्त्वाचं)
५) कुठल्याही क्षणी आनंदी राहण्याची कला
६) समाधानी वृत्ती
पहिल्या पाच गोष्टी साधल्या, की समाधानी वृत्ती येते. या सहा गोष्टी असल्यास व्यक्तीचं जीवन समृद्ध म्हणता येईल. लहानपणापासूनच व्यक्तिमत्त्व विकास या संकल्पनेत समृद्धी संदर्भातल्या या व्याख्येचा अंतर्भाव असायला हवा.
आज आनंदी समाजनिर्मितीच्या आड समृद्धीच्या चुकीच्या कल्पनांबरोबरच सर्वत्र जाणवणारा वैयक्तिक आणि सार्वत्रिक ताणतणाव हे कारण आहेच. आणि लहानपणापासूनच मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासंदर्भात या दोन्ही मुद्द्यांचा विचार व्हावा. स्पर्धेच्या युगात ताण तणाव अपरिहार्य आहेत. त्याचबरोबर त्यांना तोंड देण्याची क्षमता मुलांमध्ये लहानपणापासून निर्माण होणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. त्यांचा आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असंल हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास असा व्हायला हवा, की त्यात कुठल्याही तणावाच्या परिस्थितीत मन शांत, स्थिर, कणखर आणि आनंदी असायला हवं. मनाचं पॉझिटिव्ह प्रोग्रॅमिंग बऱ्याच अंशी शक्‍य आहे. त्यासाठी आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात मुलांचा ‘व्यक्तिमत्त्व विकास’कडं खूप वेगळ्या अर्थानं पाहायला हवं. व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे केवळ भौतिक यश, भरपूर पैसा, नावलौकिक मिळवण्यासाठीची क्षमता निश्‍चितच नव्हे. या गोष्टींबरोबरच चांगला, जबाबदार नागरिक होणं, समाजाप्रती संवेदनशील बनणं व शांत, स्वस्थ, आनंदी राहू शकणारं सकारात्मक आणि कणखर व्यक्तिमत्त्व बनणं हे जास्त महत्त्वाचं. आयुष्यातील चढ-उतार, यश-अपयश सहज स्वीकारता येण्याची क्षमता मिळवणं महत्त्वाचं. असं व्यक्तिमत्त्व विशिष्ट प्रयत्नांनी मिळवता येतं. मनाच्या ‘व्यायामशाळे’साठी निर्माण केलेल्या काही व्यायामांनी हे साध्य होऊ शकतं. अगदी कुणालाही. या व्यायामातून दोन दिशांनी व्यक्तिमत्त्व विकसित व्हावं. एक दिशा बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठीची (आउटर जर्नी) तंत्रं, व्यायाम शिकवणारी, तर दुसरी आंतरिक स्वस्थतेसाठीची (इनर जर्नी) साधना शिकवणारी हवी. म्हणजेच आतलं विश्‍व शांत, स्वस्थ आणि आनंदी बनवणारी. हे जमलं की मग खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्त्व विकास झाला...
या सर्वांची सुरवात महत्त्वाची. ती करावी लागते मुलांच्या व्यक्तिमत्त्व, स्वभावामधील, विचार करण्याच्या पद्धतीतील दोष दूर करून. मुलांमधील काल्पनिक भीती, स्वतःविषयीच्या नकारात्मक कल्पना, जगाविषयीच्या आणि जगण्याविषयीच्या चुकीच्या कल्पना, व्हिडिओ गेम्स वा मोबाईल फोनच्या अतिरिक्त आहारी जाणं, आसपास घडणाऱ्या, टीव्हीवर दिसणाऱ्या गोंधळून टाकणाऱ्या घटनांचा नकारात्मक प्रभाव या आणि अशा सगळ्या गोष्टींचा प्रभाव नाहीसा करावा लागतो. तर आणि तरच नवीन चांगल्या गुणांची, सवयींची लागवड होऊ शकते. मुलांमध्ये आधीपासून असलेल्या चांगल्या गोष्टींची मशागत करून व्यक्तिमत्त्व विकासात त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो.
बाह्य आणि अंतर्गत समाधान
स्पर्धात्मक जगात यशस्वी व्हायचं असल्यास आउटर व इनर जर्नी या दोन्ही दिशांच्या प्रवासासाठी प्रयत्न करावे लागतील.
आउटर जर्नी ः आउटर जर्नी म्हणजेच व्यक्तिमत्त्वाचा भौतिक यशाच्या दृष्टीनं विकास होण्यासाठी पुढील गुण रुजायला हवेत.
अ) आत्मविश्‍वास, संभाषण कौशल्यं, निर्णयक्षमता, धैर्य, सकारात्मक विचारसरणी, दूरदृष्टी, संतुलित विचारसरणी आणि कुठल्याही परिस्थितीत शांत राहण्याची क्षमता. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्व-प्रयत्नानं या क्षमता मिळवता येतात. प्रत्येक व्यक्तीची मानसिक जडणघडण वेगवेगळी असते. तिला अनुसरून वेगवेगळ्या थेरपी तज्ज्ञ तयार करतात.
ब) आंतरिक क्षमतेच्या विकासासाठी पुढील गुण रुजवायला हवेत.
१) सहानुभूती ः समोरच्याला समजून घेण्याची क्षमता.
२) कल्पकता आणि निर्मितीक्षमता ः कल्पनाशक्ती आणि सर्व क्षमता पूर्ण वापरून मी निर्मितीक्षम असलो पाहिजे.
३) उत्कटता आणि तळमळ ः माझं ध्येय गाठण्यासाठी तीव्र तळमळ हवी.
४) आयुष्यभरासाठी विद्यार्थी असणं ः नवनवीन गोष्टी शिकण्याची उमेद कायम हवी.
५) चांगला श्रोता ः समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्याची क्षमता विकसित व्हावी.
६) आपलं म्हणणं समजावून देण्याची क्षमता ः तार्किकदृष्ट्या आपलं म्हणणं समोरच्याला पटवून त्याच्याकडून कृती करवून घेण्याची क्षमता हवी.
७) जबाबदारी ः आपल्या निर्णयांची, कृतींची जबाबदारी घेण्याची क्षमता हवी.
८) नेतृत्व ः कुठल्याही मानसिकतेच्या समूहाचं नेतृत्व करण्याची क्षमता  हवी.
९) प्रामाणिकपणा आणि मूल्य ः आपल्या भूमिकेशी आणि मूल्यांशी प्रामाणिक राहायचा कणखरपणा हवा.
१०) सर्वश्रुतता आणि सावधपणा ः आजूबाजूच्या जगात काय चाललंय, इतर स्पर्धकच नव्हे, तर जागतिक सामाजिक घडामोडींविषयी दक्ष असावं.
११) अद्ययावत तंत्रज्ञान ः तंत्रज्ञान अद्ययावत होत आहे, ते आत्मसात करायलाच हवं.
१२) स्वयंमूल्यमापन ः स्वतःकडं, स्वतःच्या प्रगतीकडं आणि स्वस्थतेकडं त्रयस्थपणे पाहून मूल्यमापन करायला हवं.
आंतरिक स्वास्थ्य महत्त्वाचं
बाहेर यशस्वी होत असतानाच आंतरिक स्वास्थ्याकडं, मन:शांतीकडं होणारा प्रवास तितकाच महत्त्वाचा आहे. बाहेरच्या यशापयशाचा माझ्या मनःशांतीवर काहीही परिणाम होणार नाही; माझ्या मनाचा गाभा नेहमी शांत, स्वस्थ, कणखर आणि आनंदी राहणं यासाठीचे प्रयत्न यामध्ये येतात. एकूणच माझ्या व जगाच्या अस्तित्वाविषयीची जाण, मानवी प्रयत्नांची मर्यादा आणि हातात नसलेल्या गोष्टींचा स्वीकार, आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात व्यतीत करण्याचा दृष्टिकोन यात अंतर्भूत आहे. नियमित केलेल्या ध्यानामध्ये मनाच्या डोहात खोलवर जाऊन शांत होत जाणं यात अपेक्षित असतं. ताण तणावाचे खरे स्रोत शोधून तणावाचं व्यवस्थापन करणं. बऱ्याचदा ताण का येतो, याची खरी कारणं आपल्या लक्षात येत नाहीत किंवा कळत-नकळत आपण खऱ्या कारणांकडे दुर्लक्षही करतो.
तणावाचं मूळ शोधा
दबलेल्या भावना, अपराध गंड, न्यूनगंड, दुर्बल आत्मप्रतिमा इत्यादी गोष्टी या ताणांच्या मुळाशी असू शकतात. त्या तज्ज्ञांच्या साहाय्यानंच दूर करायला हव्यात, अन्यथा हे ताण-तणाव आपल्याला नैराश्‍याच्या गर्तेत ढकलतात. त्याचा आपल्या शरीर व मनावर विपरीत परिणाम होतो. त्यातून अनेक मनोकायिक आजार आणि व्याधी जडू शकतात. म्हणूनच तणावाचं व्यवस्थापन लहानपणापासून शिकणं महत्त्वाचं आहे.
 तणाव व्यवस्थापनाचे फायदे
 शारीरिक तब्येत सुधारते. उत्साह, जोम प्रतिकारशक्ती वाढते. भावना स्थिर होतात, नियंत्रणात राहतात. यातून सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोन रुजायला मदत होते.
 मन फोकस करण्याची क्षमता वाढते. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील कामगिरी उत्तम होते. नवनवीन गोष्टी शिकण्याची उमेद व क्षमता वाढते.
ध्यानधारणा आणि साक्षीभाव 
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार प्राणायाम व ध्यानधारणा यांचा उत्तम उपयोग होतो. साक्षीभावानं सर्व घटना पाहण्याची सवय मन शांत ठेवते, त्याशिवाय तणाव नियोजन अशक्‍य आहे. एकूणच मनःस्वास्थ्य आणि आनंद कुठल्याही परिस्थितीत टिकवता येईल का, याचं उत्तर होकारार्थी आहे. त्यासाठी आतून स्वस्थ व्हायला हवं. शांतपणे परिस्थितीचं निरीक्षण करायला हवं. कुठल्या गोष्टी आपल्या आवाक्‍यात आहेत आणि कुठल्या नाहीत, हे शांतपणे समजून घ्यायला हवं.
जे टाळणे अशक्‍य दे शक्ती ते सहाया,
जे शक्‍य साध्य आहे निर्धार दे कराया,
मज काय शक्‍य आहे, आहे अशक्‍य काय
माझे मला कळाया देई बुद्धी देवराया !
या प्रार्थनेतील मर्म समजून घेतल्यास बरेच प्रश्न सुटतील.
सर्वांच्याच संदर्भात आपलं ‘आतलं’ जग शांत राहिलं, तरच ‘बाह्य’ जगासाठी आवश्‍यक असलेली स्वस्थता, भावनिक समतोल, कार्यक्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, धैर्य, तणाव (व्यक्तिगत, कौटुंबिक नोकरीतील) सहन करण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी साध्य होतील. मानसिक ताकद वाढंल आणि जगण्यातला प्रत्येक क्षणातला आनंद वाढंल. म्हणूनच ‘आतलं’ जग शांत करण्यासाठी आणि आनंदी राहाण्यासाठी रोज काही वेळ ‘स्व’कडं पाहण्याची सवय व्हायला हवी. नवीन पिढीचा योग्य अर्थानं होणारा व्यक्तिमत्त्व विकास, त्यांचं एकूणच जीवनाविषयी आणि समृद्धीच्या कल्पनेविषयी असणारं वस्तुनिष्ठ भान आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळंच पुढच्या काळातील समाज आनंदी राहील आणि ‘हॅपीनेस इंडेक्‍स’सारख्या तांत्रिक गोष्टींच्या पुढं जाऊन देश खऱ्या अर्थानं समाधानी होईल...

Monday, March 13, 2017

Live hear and now


From Loksatta article by Dhanashree Lele. 

बा. भ. बोरकर म्हणतात, ‘प्रत्येक क्षणाचा एक मध असतो, तो तेव्हाच चाखायला हवा.’ हा क्षण नंतर अनुभवू म्हटलं तर जमत नाही.. आत्ता .. इथे ..नाऊ  अ‍ॅण्ड हीअर.. नाही तर.. नेव्हर.. हीच क्षणांची परिभाषा.. ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’ सांगताना माऊलींच्या मनात कदाचित हीच परिभाषा असेल. देवाच्या द्वारी उभा राहून त्या एका क्षणाचा पुरता अनुभव घेणं, त्या क्षणात पूर्ण मन ओतणं, आपल्या स्वत:चा विसर पडणं, म्हणजे एका अर्थाने मुक्तीच! अशा मुक्तीसाठी एक क्षण पुरतो. कधी देवाच्या द्वारावरचा तो एक क्षण पकडणं म्हणजे मोक्ष तर कधी मोहाचा क्षण सोडणं म्हणजे मोक्ष. घडतं ते सगळं क्षणातच.. म्हणूनच ऋषी, मुनी, विचारवंत ‘क्षणस्थ’ व्हायला सांगतात. हातावर घडय़ाळ आपण बांधत असलो तरी क्षण आपल्याला बांधून ठेवतात. थोडं साहित्यिक भाषेत सांगायचं तर पुढे पुढे सरकत जाणारे क्षणबिंदू म्हणजे जीवन.. आणि प्रत्येकाच्या क्षणबिंदूंची संख्या वेगळी. कुणाच्या वाटय़ाला किती क्षण आहेत हे आपल्याला माहीत नाही.. म्हणून वाटय़ाला आलेला प्रत्येक क्षण जगणं, अनुभवणं म्हणजे ‘क्षणस्थ’ होणं.

कबीरांची गोष्ट आठवते. एकदा दोन माणसं खूप मोठय़ाने भांडत होती. कबीर तिथूनच चालले होते. दोन माणसं भांडत असताना तिसऱ्याने खरं तर तिथे थांबू नये पण तरीही कबीर तिथेच उभे राहिले. नुसते उभे नाही राहिले तर थोडय़ा वेळाने गालातल्या गालात हसायला लागले. भांडण वाढायला लागल्यावर मोठमोठय़ाने हसायला लागले. इतके की, त्यांचा आवाज ऐकून भांडणारे थांबले. ‘‘भांडतोय आम्ही, इथे हसण्यासारखं काय आहे?’’ त्यातल्या एकाने विचारलं. कबीर म्हणाले, ‘‘अरे तू आत्ता जे म्हणालास ना त्यावरच हसायला येतंय मला. तू काय म्हणालास याला.. उद्या तुला नाही धडा शिकवला तर नाव बदलून टाकेन. म्हणालास ना? एक म्हणजे ज्या नावाचा तुला एवढा अभिमान आहे ते तू ठेवलेलंच नाहीस आणि दुसरं, तू धडा कधी शिकवणार? उद्या! एवढा विश्वास आहे तुला तुझ्या पुढल्या क्षणावर?
पाव पल कि सुधी नही, करे कल का साज
काल अचानक मारसी ज्यो तितर को बाज..’’
क्षणात डोळे उघडतात. हाती आलेल्या क्षणाचं महत्त्व क्षणात पटतं.. ज्याला कायम क्षय असतो, तो क्षण ..अशी व्याख्या सुचून जाते.
‘कर्मणि एव अधिकार: ते’च्या चालीवर ‘उपलब्धे क्षणे एव अधिकार: ते’ आत्ताच्या क्षणावरच काय तो आपला अधिकार याची जाणीव होते.

Thursday, March 09, 2017

Old memories with Instant Camera

वाढदिवसाच्या निमित्ताने मुलाला एक छोटा कॅमेरा घेतला. इन्स्टंट फोटो निघणाऱ्या कॅमेऱ्याचे सध्या फॅड आहे असे दिसते. (काय गंमत आहे पहा -- फिल्म कॅमेरे गेले व त्याची जागा डिजिटलने घेतली. आता डिजिटल आहेत पण ते प्रिंट करायला वेळ लागतो म्हणून व थोडा retro फील येतो म्हणून पुन्हा इन्स्टंट कॅमेरे आले आहेत. असो.)   ह्या निमित्ताने मन खूप वर्षे मागे गेले. मी साधारण ७ वी मध्ये असेन. कॅमेरा हि तेंव्हा चैनेची गोष्ट होती. दिसेल त्याचा फोटो काढून फेसबुक व इंस्टाग्राम वर टाकायचे दिवस नव्हते. जे दिसेल ते डोळ्यांनी पाहायचं आणि जमलं तर मनात साठवायचं एवढंच काय ते साधंसुधं आयुष्य होतं.  पेपर मध्ये जाहिरात यायची व नवीन कॅमेरा कसा आला आहे याबाबत माहिती असायची. कॅमेरा जवळून पहिला नव्हता व हाताळण्याचा प्रश्नच नव्हता. पण कुतूहल होत.





कोडॅकचा हॉट शॉट नावाचा कॅमेरा आला होता. त्याची खूप जाहिरात यायची. तो इंस्टमॅटिक कॅमेरा होता.  मला वाटलं छोटा आहे म्हणजे स्वस्त (माझी तेंव्हाची स्वस्त ची कल्पना लक्षात घेऊन) असेल. गावात एका दुकानात खिडकीत त्याची जाहिरात पाहिली व प्रत्येकवेळा जाताना मी तिथे ५-१० मिनिटे घुटमाळायला लागलो. कालांतराने त्या दुकानदाराला ते कळलं असावं म्हणून त्याने एक दिवस विचारलं कि काय हवंय.  संधीचा फायदा घेऊन मी कॅमेराची किमंत विचारली. एवढासा मुलगा कॅमेराची किंमत विचारेल अशी त्याला कल्पना नसावी त्यामुळे थोडासा चिडका सूर लावून त्याने सांगितले २००० रु.  हे म्हणजे माझ्या कल्पनेच्या पलीकडे होते. मी दुकानातून काढता पाय घेतला पण कॅमेरा कधीतरी घ्यायचा असं मनात घोळत राहिलं.  ७  वी ची स्कॉलरशिप ची परीक्षा दिली व स्कॉलरशिप मिळाली कि कॅमेरा घ्यायचा असं ठरवलं.  स्कॉलरशिप मिळालीही पण ती दर महिन्याला मिळायची व कॅमेरा घेण्याइतकी तर नक्कीच नव्हती. पैसे साठवून कॅमेरा घेवू असं मनाशी ठरवून एका डब्यात पैसे साठवायला सुरुवात केली. ८ वी नंतर अभ्यास वाढला व हे मी विसरूनही गेलो.  खूप नंतर मी एक छोटा कॅमेरा व नंतर फिल्मचा SLR घेतला. आता डिजिटल SLR हि घेतला. हा इन्स्टंट कॅमेरा पाहून जुन्या आठवणी उचंबळून आल्या व तेंव्हाचे दिवस आठवले इतकंच!

Tuesday, March 07, 2017

Perfection in art?

Does art need to be perfect?  Isn't the fact that it is "art" itself means there is free-form, creativity and no goal such as perfectionism?

If a child draws or paints or builds something, probably by imitating another great art, isn't the process of doing it itself rewarding?  Why does the end result have to be 'perfect'?

Perhaps when a budding artist is taught to hone her skills, it is the perfection of the skill, not the end result itself that her teachers are concerned about.  Probably, the teacher does not want lack of skill to be a hindrance in art education. I think aiming for perfection in that area is more of skill development.

Monday, March 06, 2017

It takes courage to build bridges

Srinivas Kuchibhotla, an Indian immigrant engineer, was shot by a white American in Olathe, Kansas.  Apparently, it was a hate crime, as the gunman asked him and his friend whether they were in the US legally. Perhaps he killed him out of his anger and frustration that immigrant community is taking away high-tech jobs. Perhaps he thought they were Muslims and/or from middle east. Perhaps it was fueled by recent executive orders by the POTUS.  Media is quick to establish such links and the Internet is filled with many such stories that only beget more hatred, fear and divisions among communities.

I didn't know Srinivas.  Not even through any of my immediate contacts.  My only possible connection with him would be that we both are from India, engineers and working in USA.  I could have brushed away this event as one of the many sad incidents I hear/read on the news everyday. But for some reason (most likely because I belong to the same race or country), I really felt sorry for him and his family and many thoughts rushed through my mind.

The gunman didn't just kill Srinivas.  He shattered many dreams - his, his parents', his wife's and friends and sent a ripple of fear in the immigrant community.  I only wish the gunman had talked and listened to him more.  Perhaps if they had a beer together and got to known each other, the gunman would have realized that Srinivas not a threat to the community or even his job. He was just like any other immigrant - trying to find better means for himself and his family.  Only if they had a dialog, they would have realized they had more in common than what separated them. One irreversible decision of killing him and so many lives and communities are impacted.


It is easy to build walls and surround yourself with familiar faces, faith, interests. But it takes courage to build bridges and talk to people you don't know. It takes certain faith to believe that other person is also a decent human being. But I believe it is more rewarding than to simply build walls and live in a shell. That's the true way to celebrate diversity, not simply by writing slogans on the wall.

Side note:
I have been in USA for almost two decades and the USA I know is not like this.  I have traveled even the interior parts of Texas where they had hard time understanding my Indian accent, but I found people very warm and friendly.  No one looked at me with suspicion or fear.  No one asked me whether I was in US legally.  In fact, I remember receiving admiration from some strangers for coming so far away from my country and family to study further.

Wednesday, March 01, 2017

Be grateful for what you have...

नुकताच एक हिंदी शेर वाचण्यात आला :
मिलता तो बहुत कुछ है इस जिंदगी में
बस हम गिनती उसी कि करते है 
जो हासिल न हो सका
आपला मनुष्यस्वभावच असा आहे, खरं ना?  जे आहे त्याबद्दल समाधानी फार क्वचित असतं पण जे नाही त्याची मात्र सतत टोचणी असते मनाला.  सारखं आपलं "यू होता तो कैसा होता" ची ट्यून सुरु असते.  कधीकधी त्याचं पर्यवसान चिडचिड, कुरबुरीत किंवा थोड्याश्या "cynical attitude" मध्ये पण होतं.  हा मानवी स्वभावाचा धर्मच आहे हे एकदा समजलं कि आपण त्याच्या खेळाला हार जात नाही. मग आपली समाधानी वृत्तीकडे वाटचाल सुरु होते.

वरच्या हिंदी शेर वाचल्यानंतर मला सुचलेलं स्वैर भाषांतर:
मनाची पहा काय आहे गंमत
जे आहे ते नाही पसंत
जे नाही त्याची खंत
काळ सरारा सरके
जगाया नाही उसंत
कधी गेल्याची व्यथा
वृथा येणाऱ्याची चिंता
दोलायमान स्थिती
कसे येईल 'आज' जगता?

Be grateful for every moment you have.  You never know which one is your last!