Old memories with Instant Camera
वाढदिवसाच्या निमित्ताने मुलाला एक छोटा कॅमेरा घेतला. इन्स्टंट फोटो
निघणाऱ्या कॅमेऱ्याचे सध्या फॅड आहे असे दिसते. (काय गंमत आहे पहा -- फिल्म
कॅमेरे गेले व त्याची जागा डिजिटलने घेतली. आता डिजिटल आहेत पण ते प्रिंट
करायला वेळ लागतो म्हणून व थोडा retro फील येतो म्हणून पुन्हा इन्स्टंट
कॅमेरे आले आहेत. असो.) ह्या निमित्ताने मन खूप वर्षे मागे गेले. मी
साधारण ७ वी मध्ये असेन. कॅमेरा हि तेंव्हा चैनेची गोष्ट होती. दिसेल
त्याचा फोटो काढून फेसबुक व इंस्टाग्राम वर टाकायचे दिवस नव्हते. जे दिसेल
ते डोळ्यांनी पाहायचं आणि जमलं तर मनात साठवायचं एवढंच काय ते साधंसुधं
आयुष्य होतं. पेपर मध्ये जाहिरात यायची व नवीन कॅमेरा कसा आला आहे याबाबत
माहिती असायची. कॅमेरा जवळून पहिला नव्हता व हाताळण्याचा प्रश्नच नव्हता.
पण कुतूहल होत.
कोडॅकचा हॉट शॉट नावाचा कॅमेरा आला होता. त्याची खूप जाहिरात यायची. तो इंस्टमॅटिक कॅमेरा होता. मला वाटलं छोटा आहे म्हणजे स्वस्त (माझी तेंव्हाची स्वस्त ची कल्पना लक्षात घेऊन) असेल. गावात एका दुकानात खिडकीत त्याची जाहिरात पाहिली व प्रत्येकवेळा जाताना मी तिथे ५-१० मिनिटे घुटमाळायला लागलो. कालांतराने त्या दुकानदाराला ते कळलं असावं म्हणून त्याने एक दिवस विचारलं कि काय हवंय. संधीचा फायदा घेऊन मी कॅमेराची किमंत विचारली. एवढासा मुलगा कॅमेराची किंमत विचारेल अशी त्याला कल्पना नसावी त्यामुळे थोडासा चिडका सूर लावून त्याने सांगितले २००० रु. हे म्हणजे माझ्या कल्पनेच्या पलीकडे होते. मी दुकानातून काढता पाय घेतला पण कॅमेरा कधीतरी घ्यायचा असं मनात घोळत राहिलं. ७ वी ची स्कॉलरशिप ची परीक्षा दिली व स्कॉलरशिप मिळाली कि कॅमेरा घ्यायचा असं ठरवलं. स्कॉलरशिप मिळालीही पण ती दर महिन्याला मिळायची व कॅमेरा घेण्याइतकी तर नक्कीच नव्हती. पैसे साठवून कॅमेरा घेवू असं मनाशी ठरवून एका डब्यात पैसे साठवायला सुरुवात केली. ८ वी नंतर अभ्यास वाढला व हे मी विसरूनही गेलो. खूप नंतर मी एक छोटा कॅमेरा व नंतर फिल्मचा SLR घेतला. आता डिजिटल SLR हि घेतला. हा इन्स्टंट कॅमेरा पाहून जुन्या आठवणी उचंबळून आल्या व तेंव्हाचे दिवस आठवले इतकंच!

0 Comments:
Post a Comment
<< Home