Wednesday, March 01, 2017

Be grateful for what you have...

नुकताच एक हिंदी शेर वाचण्यात आला :
मिलता तो बहुत कुछ है इस जिंदगी में
बस हम गिनती उसी कि करते है 
जो हासिल न हो सका
आपला मनुष्यस्वभावच असा आहे, खरं ना?  जे आहे त्याबद्दल समाधानी फार क्वचित असतं पण जे नाही त्याची मात्र सतत टोचणी असते मनाला.  सारखं आपलं "यू होता तो कैसा होता" ची ट्यून सुरु असते.  कधीकधी त्याचं पर्यवसान चिडचिड, कुरबुरीत किंवा थोड्याश्या "cynical attitude" मध्ये पण होतं.  हा मानवी स्वभावाचा धर्मच आहे हे एकदा समजलं कि आपण त्याच्या खेळाला हार जात नाही. मग आपली समाधानी वृत्तीकडे वाटचाल सुरु होते.

वरच्या हिंदी शेर वाचल्यानंतर मला सुचलेलं स्वैर भाषांतर:
मनाची पहा काय आहे गंमत
जे आहे ते नाही पसंत
जे नाही त्याची खंत
काळ सरारा सरके
जगाया नाही उसंत
कधी गेल्याची व्यथा
वृथा येणाऱ्याची चिंता
दोलायमान स्थिती
कसे येईल 'आज' जगता?

Be grateful for every moment you have.  You never know which one is your last!

0 Comments:

Post a Comment

<< Home