सुरुवात
कुठून बर सुरुवात करू?
हे बघा माझं ना असच होतं नेहमी.. म्हणजे खूप गोष्टीत मला ना कुठुन सुरुवात करायची तेच कळत नाही..
माझ्यातल्या कमतरतेबद्दल आमच्या हिन जी केकावली रचली आहे त्यातल्या ह्या एकाच पदावर आमचं एकमत आहे
. . तर सुरुवात करण्याबद्दल.. म्हणजे उदाहरणार्थ घरात खूप पसारा झाला असेल तर तो कुठून आवरायला सुरुवात
करायची ते मला कळत नाही आणि मग तो दिवसेंदिवस वृद्धिगंत होतो आणि माझी समस्या अधिक जटील करतो !

एखादी अपरिचित व्यक्ती भेटली किंवा कुणी माझी नवीन माणसाशी ओळख करून दिली तर बोलायला सुरुवात कुठून
करावी ते मला कळत नाही!
करावी ते मला कळत नाही!
कुणाला पत्र लिहायचं झालं तर मायना काय लिहायचा ते मला समजत नाही! एकदम मसुदा लिहून पाठवलेली अनेक
पत्रे उलट टपाली मला परत आलेली आहेत!
पत्रे उलट टपाली मला परत आलेली आहेत!
बफे जेवण पद्धतीत ताटात सुरुवातीला काय वाढून घ्यावं ते माझ्या लक्षात येत नाही. म्हणजे अनेकदा सुरुवातीचे पदार्थ
घेतल्यामुळे इतरांना न्याय देता येत नाही आणि "खाद्याभ्यासाला" (survey of foods) जावं किंवा उलटीकडून पदार्थ
घ्यायला जावं तर रांगेतील लोक "पहिल्यांदाच बफे मध्ये आलेला दिसतोय - मॅनर्स नाहीत!" अशा नजरेनं बघतात व
"जेवण नको नजरा आवर" असे म्हंणण्याची पाळी येते.

दर वर्षी (कधीही सिद्धीस न जाणारे) संकल्प केल्यावर त्याला सुरुवात कुठून करावी हे न कळल्याने घरात डायऱ्या,
वजन कमी करण्याची विविध साधने, जिम साठी लागणारे सामान, "सेल्फ हेल्प" ची अनेक पुस्तके ह्याचा पसारा वाढत
चाललाय ! एके वर्षी तो पसारा कसा आवरायचा यासाठी पण एक "organize your s(h)elf" नावाचं पुस्तक पण आणलं
पण त्याची वाचनाची सुरुवात कुठून नि केव्हा करायची ते उमजलं नाही. ह्याच धर्तीतली "करा सुरु आत्ताच!",
"just get started", "stop postponing, start living" अशी आणखी काही पुस्तकेही आणली. पण अजून त्यांची पाने
सुद्धा फाडून झाली नाहीत!

तशी आमची ही खूप मनस्वी आहे (खरा अर्थ: तिच्या मनाला येईल ते मला न सांगता करणारी) त्यामुळे अमुक एका
गोष्टीसाठी कधी ती रुसायचे प्रसंग येत नाहीत. पण जर यदाकदाचित ती हिरमुसून बसली असेल तर तिला मनवायला
कुठून सुरुवात करावी ते सुद्धा मला कळत नाही. (हा प्रश्न तसा गहन आहे.. या क्षेत्रातील माहीर लोकांनी लेखकाशी
स्वतंत्ररित्या संपर्क साधावा हि विनंती).

अस्मादिक कॉलेजला असताना कुठून सुरुवात करायची हे न उमजल्याने अनेकजणी त्यांची तारीफ ऐकायला मुकल्या
आहेत व नंतर अनेक कविता जन्माला आल्या आहेत!.. (चाणाक्ष वाचकांनी काय ते ओळखावे!). आरंभचोर
(आरंभशूर च्या विरुद्ध?) असं काही बिरुद असेल तर ते पटकावण्यात माझा नंबर पहिला असेल.!

अर्थातच लमाल च्या लिखाणाच्या बाबतीतही असच होत. मी ह्या विषयावर पूर्वी उहापोह केला होताच
(जिज्ञासूंनी 'कल्पना' या विषयावरील आमचे लिखाण अभ्यासावे)

तर सांगायचा मुद्दा हा कि मला काही म्हणता काSSही सुचत नाही.. आशिषनं विषयाला अनुसरून चिंतन करायला
चांगले २ महिने दिलेले असतात. चैतालीने महिन्यातून स्मरणपत्र (reminder) पाठवून "आता (तरी) लिहा" असं हळूच (?)
सुचवलेलं असत..पण जमतच नाही. म्हणजे तसा मी अजिबात आळशी नाही असा माझा समज आहे
(माझ्या पत्नीचे याबाबत दुमत असले तरी व्यक्ती व्यक्ती मतेर्भिना: हे चाणाक्ष आणि विवाहित वाचकांना समजण्यासारखे
आहे) तरी पण कुठून सुरुवात करायची ते काही नेमकं कळत नाही आणि मग त्यावर सखोल विचार करत असताना
शेवटची वेळ येते -- म्हणजे लमाल साठी लिखाण पोस्ट करायचा शेवटचा दिवस उजाडतो! शिवाय पोस्ट केल्याशिवाय
वाचायचं नाही असा एकंदरीत शिरस्ता / पायंडा असल्याने मग माझी घिसाडघाई होते. काहीबाही लिहून मोकळं व्हायचं
(म्हणजे मग मी नियमितपणे लिहितो हे बिरुद मिरवायला बरं !)

पण नाही या वेळी लमाल साठी अगदी वेळेवर लिहायचं ठरवलं आणि लिहायला बसलो. पण काय शेवटी writer's block !
तो काय कुणाला चुकलाय ? अगदी war & peace चा ठोकळा लिहिणाऱ्या टॉल्स्टॉयला पण नाही (असं म्हणतात)!
मग काय बसलो आंतरजाल ढुंढाळत.. कमी का विषय आहेत बघायला? शिवाय एका धाग्यातून दुसरीकडे मग तिसरीकडे,
अगदी अंतराळात मुक्त सफर करतो आहोत असंच वाटत. मग फिनाईल कसे करावे पासून मंगळावर वस्ती आहे का अ
से नानाविध विषय. आणि मी म्हणतो ह्याचा अभ्यास का करू नये माणसानं? म्हणजे उद्या परवा मंगळावर परिभ्रमणासाठी
जाण्यासाठी यदाकदाचित माझी निवड झाली तर अडायला नको ना ! ((कोण म्हणलं नाही होऊ शकत?) शिवाय
आपला लाडका मार्क आहेच.. त्याने इतके मित्र जोडून दिलेत ना कि त्यांच्या दैनंदिन जीवनात डोकावून बघितल्याशिवाय
दिवस सुरु झाल्यासारखं वाटतच नाही.. तसे सगळेच काही ना काही छान लिहीत असतात त्यांच्या आपापल्या भिंतींवर.
मग त्यांचं लिहिणं आवडलंय असं (खोटं का होईना पण) दाखवणं म्हणजे like करणं, विचारपूर्वक सुयोग्य comment
करणं, दुसऱ्यांच्या comments वाचणं परत त्यावर शेरेबाजी करण, प्रत्येक वेळी आलेल्या नवीन कंमेंट्स अभ्यासणे,
रोज कुणाचे ना कुणाचे वाढदिवस असतातच त्यांना virtual फुले पाठवून शुभेच्छा देणे.. -- किती तरी काम असतात!
बर जर इतर लोक यदाकदाचित Wifi च्या त्रिज्येच्या बाहेर असतील आणि त्यांनी त्यांचे दिवसाचे पान कोरे ठेवलं असेल.
(हो हो Wifi त्रिजेच्या बाहेर एवढ एकच खरं कारण .. बिझी वगैरे काही नसतं कोणी!) हं तर काय सांगत होतो. जर त्यांनी
काही लिहिलं नसेल तर मार्क बिचारा आपल्याच जुन्या जुन्या आठवणी आपल्याला नव्याने दाखवत असतो, अमुक वेळी
तुम्ही काय करत होता, कुठे खात होता, कसे दिसत होता, वगैरे वगैरे. मग एकेकाळचा आपला आकार आणि चेहऱ्याची
सुबकता पाहून हरकून जायला होतं -- आणि हा आनंद कधी एकदा मित्राबरोबर वाटतो असं वाटायला लागत. ते काम पण
मार्क ने इतकं सोपं करून ठेवलंय ना हल्ल्ली कि विचारू नका.. मला तर ना कधीकधी त्याची मीठ मोहरीन दृष्टच
काढावीशी वाटते! मित्र मैत्रिणीचे फोटो पाहताना काहीजण वयाने आणि आकाराने वर्षानुवर्षे गोठलेले (frozen) दिसतात.
ती कदाचित एखादी जेनेटिक डिसऑर्डर असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण तरीही त्यांचे दिवसेंदिवस टवटवीत
होत जाणारे चेहरे, उजळ कांती आणि सडपातळ बांधा यावर टिकाटिप्पणी करणे अपरिहार्य ठरते! शिवाय ते फोमो
(Fear of missing out) का काय म्हणतात तेही असेना का बापडे!

शिवाय कधी कधी मला उलटही त्रास होतो. म्हणजे एखाद्या विषयावर इतक्या कल्पना सुचतात कि जणू आपण कल्पनेच्या
बागेत फिरत आहोत असे वाटते. मग आपण एक फुलपाखरू आहोत आणि सुचलेल्या कल्पना ही वेगवेगळी फुले आहेत
अशी (आणखी एक) कल्पना सुचून त्यांचा रसास्वाद घेण्यात व तौलनिक अभ्यासात गुंतून गेल्याने यातली कोणती निवडावी,
हेच सुचत नाही. शिवाय मला ना कुठल्याही कल्पनेत डावे उजवे करता येत नाही. आईला कशी सगळी लेकरे प्रिय
असतात ना अगदी तसंच होतं . (बहुतांशी लेखक हीच उपमा का बरं देत असावेत हा माझा एक भाबडा प्रश्न!). पण
आजकाल कुठल्याच गोष्टीची सुरुवात न होणं व त्यावरून जवळच्या व्यक्तीकडून टोचून बोलणं फारच असह्य व्हायला
लागलं म्हणून मी पम्प्याला विचारायचं ठरवलं.. पम्प्या म्हणजे पंकज परांजपे - माझा शाळेपासूनचा मित्र. [जे
अस्मादिकांच्या लेखाचे नियमित वाचक आहेत ते या माझ्या गुरूला लगेच ओळखतील. गेल्या वर्षी त्याचा सल्ला मी माझ्या
"कल्पनाखोर" अवस्थेत घेतला होता हे देखील चाणाक्ष वाचकांना स्मरले असेल.]
(संदर्भ: मी आणि माझी कल्पकता, लमाल, ऑगस्ट २०१८).

तर मी पम्प्याला त्याच्या घराजवळच्या इराण्याच्या हॉटेल मध्ये भेटलो. त्याच्या आवडीची भजी आणि मस्का पाव
ऑर्डर केली.
ऑर्डर केली.
"हं बोल बाबू.. काय समस्या आहे?" भजी हिरव्या चटणीमध्ये बुडवत पम्प्या बोलता झाला.
"अरे मला ना सुरुवात कुठून करावी हेच कळत नाही." मी म्हणालो.
"अरे त्यात काय .. कुठूनही कर.. " पहिले भजे पोटात गेल्याच्या तृप्ततेचा आनंद पम्प्याच्या तोंडावर दिसायला लागला.
"तेच सांगतोय ना - कुठून सुरुवात करावी कळत नाही" मी परत सांगितलं.
"अरे माझ्यापुढे काय लाजतोस? बिनधास्त सांग.. " पम्प्या दुसऱ्या भजीत मग्न.
त्याचे निम्मे लक्ष भजीत असेच राहिले तर आमच्यातली हि "कम्युनिकेशन गॅप" तशीच राहील हे मला उमगलं.
मी त्याचं दुसरं भजे संपवून होईपर्यंत शांत बसलो. प्लेट त्याच्यापासून एक हात त्रिजेच्या बाहेर ठेवली.

दुसरे भजे गिळंकृत झाल्यावर पम्प्याने डोळे वर करून माझ्याकडं पाहिलं.
"अरे बोल ना .. काय नक्की प्रॉब्लेम आहे? काय न संकोचता सांग."
"अरे पम्प्या तेच सांगतोय -- तू जरा भज्यातून लक्ष कमी कर आणि मग ऐक म्हणजे तुला कळेल. ..
कुठल्याही गोष्टीची सुरुवात कुठून करावी ते मला कळत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे.. " मी एका दमात उत्तरलो.
तो पर्यंत भजीची प्लेट परत त्रिजेच्या आत गेली होती.

"ओह ओके - सो धिस इस प्रॉब्लेम ऑफ द स्टार्टींग"
हा पम्प्या मधेच असा इंग्लिशवर घसरतो ते तेवढं एक सोडलं तर त्याचे सल्ले तसे बरे असतात..
"हं मग सांग आहे का काही उपाय यावर? "
"एस, धिस इस अन इश्श्यु ऑफ सुरुसुत्रता"
हा पम्प्या इंग्लिश वाक्यात असे मध्येच मराठी घुसडतो ते तेवढं मला आवडत नाही -- बाकी त्याचे सल्ले तसे बरे असतात.
"सुसूत्रता म्हणायचं आहे का तुला? " त्याला दुरुस्ती सुचवतं मी विचारलं.
"नाही -- सुरुसुत्रता -- सुरु करण्याची सुत्रता"
हा पम्प्या चुकीचा शब्द वापरला तर ते मान्य करत नाही हे काही मला आवडत नाही .. बा.त्या.स.त. ब. अ. ...
"बर मग?"
"बाबू कसं आहे ना -- ज्याची आपल्याला आवड आहे ते आपण लगेच करतो आणि जे आवडत नाही त्याची चालढकल..
धिस इस बेसिक ह्यूमन टेंडन्सी यू नो ज्याला ह्यातील समतोल साधता आला तो जिंकला "

हा पम्प्या लेका स्वतःला मोठा मानसशात्रज्ञ समजतो पण कॉलेज मध्ये त्याला सायकॉलॉजीच्या पेपरमध्ये ४३ मार्क
मिळाले होते हे मला माहितीय त्यामुळे त्याचे असे बोल मी फारसे मनाला लावून घेत नाही..

मला अजून काही नवीन ज्ञान प्राप्त झालं नव्हतं पण उगाचच पम्प्याला पांढरीशुभ्र दाढी फुटली आहे आणि आपण
त्याच्या पायाशी शिष्य म्हणून बसलो आहोत असे काहीतरी चित्र माझ्या अंतर्मनात चमकून गेले!

"तुला आठवतं, मागच्यावर्षी तू कल्पना सुचत नाहीत म्हणून रडत आला होतास.. तेंव्हा मी तुला वडापाव खायला सांगितलं
तर त्याची सुरुवात तू लगेच केलीस. कारण ते तुझं आवडतं काम !" पम्प्याने बोलायला सुरुवात केली..

ह्यातलं एक क्रियाविशेषण सोडलं तर बाकी सगळं खरं होतं. पम्प्या कधी कधी अतिशोयक्ती करतो त्याकडे जरा दुर्लक्ष
करावं लागतं बा. त्या. स.. ..
करावं लागतं बा. त्या. स.. ..
"पण ... " चहाचा घोट घेऊन पम्प्या पुढं बोलता झाला.. "तुला योगा करायला सांगितलं तर त्याची सुरुवात केलीस का लगेच
तू? बिकॉज दॅट इज युअर मोस्ट अनफेवरेट टास्क"

पम्प्याची गाडी परत इंग्लिशवर घसरली म्हणजे पम्प्या फॉर्मात आला हे मी ओळखलं.
आता योगाला मी उशिरा सुरुवात केली हे खरं होतं पण मी "डील" शोधत होतो (कि हि माझी पळवाट होती?) तेंव्हा
शीर्षासन करत असताना मुरगळेल्या मानेच्या आठवणीने मी परत शहारलो.

"आणि तुला माहितीये ना रामदासांनीच सांगितलंय 'काहीतरी केलं कि काहीतरी होतंय'".
"काय?" मी उडालोच! म्हणजे स्वतःचे विचार प्रसिद्ध लोकांच्या तोंडी आहेत असे सांगायची पम्प्याची सवय मला नवीन
नव्हती पण एकदम तो रामदासस्वामीच नाव घेईल अशी मला कल्पना नव्हती!

"काहीही काय रे.. रामदास स्वामी असं कसं म्हणतील?" मी विरोध दर्शवला..
"तेच रे - केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे -- मी जरा पॅराफ्रेज केलं एवढंच"
पम्प्याची हि पॅराफ्रेझची लॉन्ग जंप मला तरी झेपणारी नव्हती..
"बर ते जाऊदे , मग तू मला यावर उपाय सांग ना.. " मी त्याची गाडी तत्त्वज्ञानाच्या रुळांवरून हलवायचा माफक
प्रयत्न केला.
प्रयत्न केला.
"सो यू सी वूइ नीड टू अंडरस्टॅंड द बेसिक फर्स्ट. व्हाय आर वूई द वे वूई आर बिफोर वूई चेंज इट"
माझा आधीचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचं माझ्या लक्षात आलं.. मी शांत बसलो..
"तर तू आधी तुझी व्हॅल्यू सिस्टिम तपासून काढ"
आता पम्प्या भरकटत कुठल्या रुळावरून कुठल्या क्षेत्रात गेला होता हे मला अनाकलनीय होते..
"मग जे टास्क आहे ना त्याचे छोटे छोटे भाग कर.. " मस्कापावचा तुकडा तोडत पम्प्याचे प्रवचन सुरु होते.
"मग त्याचे प्रायॉरिटीझशन आणि सिक्वेन्सिंग कर" पावाला मस्का लावायचा "सिक्वेन्स" पूर्ण करत पम्प्या म्हणाला..
"मग छोटी काम आधी कर आणि मोठी कर .. किंवा उलटे केलेस तरी चालेल.. ऑल डिपेन्डस ऑन यू !"
काय? उलटे केले तरी -- म्हणजे कसेही केले तरी चालेल?
"बट यू आर नॉट सॉलविंग माय प्रॉब्लेम " -- आपण पण इंग्लिशमध्ये ठासून काही बोललं कि पम्प्या लक्ष देऊन ऐकतो
असा माझा अनुभव होता..
असा माझा अनुभव होता..
पम्प्याने डोळे पूर्ण उघडून बघितलं.. हे तो विषयावर बोलायला खऱ्या अर्थाने जागृत झाल्याचं लक्षण!
त्यानं न बोलता खिशातून एक छोटी डायरी काढली त्यात गिचमिड अक्षरात काहीतरी लिहायला लागला.
साधारण ५-७ मिनिटे तो काहीतरी खरडत होता.. नंतर त्यानं त्यातला तो कागद फाडून माझ्या हातात ठेवला.
“जा वत्सा -- तुझे कल्याण होवो” असा काहीसा भाव त्याच्या नजरेत होता आणि शेवटचे भजे तोंडात टाकून पम्प्या
“बाय” करता झाला.

मी तो कागद वाचायला घेतला. वर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं
सुरु वातीचे नियम.
त्याने सुरु आणि वात यात एवढं अंतर ठेवलं होतं कि तो फुलवातीसारखा एखादा वातीचा प्रकार वाटावा! त्या खाली
गिचमिड अक्षरात नियम लिहिले होते..
गिचमिड अक्षरात नियम लिहिले होते..
“आणखी काय देऊ साहेब?” - कंटाळलेल्या वेटरनं त्रासून विचारलं -- माझा चेहरा हसरा आहे की रडका आहे हे त्याला
नक्की कळलं नसणार..
नक्की कळलं नसणार..
“शेवटी काय कुठूनही सुरुवात करा म्हणजे झालं.”
काहीतरी त्रिकालाबाधित सत्य गवसल्यासारख वाटत मी बाहेर पडलो.. पम्प्याला भेटलं की मला अनेकदा असंच होतं!
त्याची सुरुसुत्रतेची गुरुकिल्ली कितपत उपयोगी पडते लवकर कळेलच!

0 Comments:
Post a Comment
<< Home