नियती (Ek laghukatha)
नियती
* १ *
लक्ष्मीनं
गडबडीत दार उघडलं. आत तिचा नवरा बल्लाळ आढ्याकडे डोळे लावून पडला खाटेवर
होता. लकवा पडल्यापासून गेले ३-४ वर्षे त्याचे हेच हाल होते. सुरवातीला
जवळपासचे नातेवाईक व शेजारी गप्पा मारायला काही हवं नको पाहायला यायचे. पण
त्याचे शब्द कळायचे नाहीत मग हळूहळू लोकांचं येणं बंद होत गेलं. आता तर
वाड्यातून बाहेर पडताना सुद्धा शेजारी विचारत नाहीत. म्हणतात ना रोज मरे
त्याला कोण रडे! नवऱ्याची आमदनी बंद झाली व घरातल्या वस्तू मोडून खायची
वेळ आली तेंव्हा लक्ष्मीला कामासाठी बाहेर पडणे भाग पडले. ओळखीने ४-५
लोकांच्या घरचे धुणी भांडे व साफसफाई चे काम मिळाले व हात तोंडाची गाठ
पडायला लागली. बरोबर आणलेला भात तिनं रश्श्यात कालवला व नवऱ्याला उठवून
भरवायला लागली. कसेबसे २-४ घास खाल्ले आणि अन्न त्याच्या तोंडातून बाहेर
पडायला लागलं .. खाटेवर पडून पडून बल्लाळ वैतागला होता. कुठून आपल्या
नशिबात ही परावीलंबत्व आलं! यापेक्षा मरण परवडलं असच त्याला वाटायचं.
लक्ष्मी पण या प्रकाराला वैतागली होती. रोज ४ घरची कामं करायची, लोकांची
बोलणी खायची आणि जे शिळंपाकं मिळेल ते खायचं याचा तिला उबग आला होता.
देवाला आणि दैवाला तरी किती दिवस दोष देणार? उगवलेला दिवस कसातरी रेटायचा
एवढच तिला माहिती होतं. त्या पलीकडं तिच्याकडं काहीच उपाय नव्हता. "येस, म्हणजे आहे." मीरानं सांगितलं.
"त्यांचा व त्यांच्या नवऱ्याचा काल विषबाधेने मृत्यू झाला. तुमच्याकडून त्यांनी पदार्थ नेले असतील तर त्यांची आम्हाला तपासणी करावी लागेल."
काही न बोलता मीरा इन्स्पेक्टरला नमुने घेण्यासाठी स्वयंपाकघराकडं घेऊन गेली.
* ५ *
तिसऱ्या रिंगला मीराने फोन उचलला.
"मीरा, कुठे आहेस तू?" मधू एकदम उत्तेजित आवाजात बोलत होता.
"अरे ती आपल्याकडची लक्ष्मी ..."
"ते
जाऊ दे -- लिस्टन गुड न्यूज फॉर यू. डॉक्टर प्रधान ना कायरासाठी मॅचिंग
डोनर मिळाला. मी हॉस्पिटलला जातोय. तू पण लगेच निघ. आपल्याला काही
फॉर्मलिटीज पूर्ण करायच्या आहेत. आपल्याला कायरासाठी उपाय सापडला -- शी इज
गोइंग टू बी आलराइट! चाल बाय -- निघ लगेच तू".
पुढंच न ऐकताच मधून फोन ठेवून दिला.
डॉ प्रधानांनी सगळी प्रोसिजर समजावून सांगितली.
"एनी मोर क्वशन्स?" सोनेरी काड्यांच्या फ्रेम मधून बघत त्यांनी विचारलं.
मधूने सही करण्यासाठी पेन काढलं. तेवढ्यात मीरा म्हणाली "मे आय नो द डोनर डॉक्टर?"
"सॉरी - ते नाही मला सांगता येणार. फक्त मी एवढच सांगू शकेन कि एका
कुटुंबाचा काळ विषबाधेने मृत्यू झाला अँड वूमन्स किडनी इस परफेक्ट मॅच फॉर
कायरा"!
मीरानं मधुकडं पाहिलं. कायरा पूर्ववत होणार ह्या आनंदापलीकडे त्याच्या डोळ्यात कुठल्याच भावना नव्हत्या...
उपाय मिळाला पण तो असा मिळेल हा दैवदुर्विलास मीराला अंतर्मुख करून गेला.
0 Comments:
Post a Comment
<< Home