Monday, February 27, 2017

Life -- a learning experience

आयुष्य कठीण अजिबात नसतं . .

कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं...

कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नसतो . .

कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो . .

कधी जागा नसते . . कधी जागा असून स्पेस नसते . . कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची उब नसते . .

कधी डब्यात आवडती भाजी नसते . . कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते . . दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते . .

कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो . . कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्या सारखे वाटते . .

कधी काही शब्द कानावर पडतात . . कधी नको ते शब्द कानावर आदळतात . .

कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात . .

कधी आपण कसे वागायचे समजत नाही . . कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही . .

कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही . . कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही . .

कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही . . कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही . .

कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही . .

कधी समोरचा /ची आपल्याला अकारण हक्काचा /ची वाटू लागते . . कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो . .

कधी पैसा असला कि नात्यांच्या मोह होतो आणि नाती असली की त्यांच्या गरजा -मौज पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमुसतो

. . . यात अजून ४-५ गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो ??

ताण घेतला तर तणाव . .
आजचे भागले म्हणून आनंद आणि
उद्याच काय म्हणून चिंता
आयुष्य कठीण करते .

आपण नदी सारखं जगावं . . सतत वहात राहाव्.......

Thursday, February 02, 2017

Reflection for today

Today I came across this from Gondavalekar Maharaj Pravachane.

 जिथपर्यंत आपल्याला स्वतःचे खरे दर्शन होऊ शकत नाही, तिथपर्यंत दुसऱ्यांचे अवगुणच आपल्याला दिसतात. आपल्याला दुसऱ्यांचे जे काही अवगुण दिसतात, त्यांचे बीज आपल्यातच आहे, हे माणसाने ठाम ओळखले पाहिजे. तेव्हा, दुसऱ्याचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे. दुसऱ्याचे अवगुण पाहणे हा साधा नेहमीचा व्यवहार आहे, तो परमार्थ नव्हे. खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षण करीत असतो. त्याला दुसऱ्याचे अवगुण दिसतच नाहीत; त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की, त्या मानाने इतर सर्वजण त्याला परमेश्वररूपच भासतात; आणि हाच खरा परमार्थ.

This reminded me of another marathi saying: "दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही " - meaning we can see even the smallest fault of others, but we are blind to our own large fallacies.  This is so true!  The person who is interested in spirituality has to look deep within and turn inward.  The more we turn inward, do self-examine, we understand our own faults. Then we automatically stop finding faults in others and blaming others.  I guess this is what Tukaram Maharaj says

माझे मज कळों येती अवगुण
काय करू मन अनावर
आता आड उभा राहे नारायणा
दया सिंधुपणा साच करी
वाचा वदे परी करणे कठीण
इंद्रिय आधीन जालो देवा
तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास
न धरी उदास माय बापा

 Similarly, J. Krishnmurti says "every relationship is a mirror". So what we see in every relationship is simply reflection of ourselves -- whatever good or bad we see in other is simply our own trait.  We understand this as we look deep inside and start examining each relationship (not only human, but also relationship with work, money, nature, animals, etc.)  I think this is what a spiritual journey is all about.  To reflect on your own thoughts, actions, inaction etc. without any attachment to it.